ग्रामीण भागातील बांधकामांबद्दल ग्रामविकास मंत्र्यांचा मोठा निर्णय

0

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 3 हजार 200 स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. या निर्णयामुळे नगररचनाकाराच्या मंजुरीअभावी रखडलेल्या ग्रामीण भागातील बांधकामातील अडचणी दूर होणार असून त्यास चालना मिळेल. ग्रामस्थांची नगररचनाकाराच्या मान्यतेसाठी होणारी धावपळ थांबेल, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. तसेच ग्रामस्थांना तळमजला अधिक दोन मजल्यापर्यंत किंवा स्टील्ट अधिक 3 मजल्यापर्यंत बांधकाम करता येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:08 PM 25-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here