भारतीय जनता पक्षाकडून आज तिसरी यादी जाहीर

0

नवी दिल्ली : विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली. तिसऱ्या  यादीमधून चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या यादीमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे,  विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश करण्यात आलेला नाही.  भाजपच्या तिसऱ्या यादीत शिरपूर मतदारसंघातून काशीराम पावरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेकमधून डॉ. मल्लिकार्जुन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली. साकोली मतदारसंघातून परिणय फुके  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मालाड पश्चिम मतदारसंघातून रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून आतापर्यंत १४३ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पहिल्यांदा १२५ आणि नंतर १४ उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली, पण त्यामध्ये खडसेंचा समावेश केला नाही.  खडसे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. दरम्यान, खडसे कन्येला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. अजूनही भाजपचे काही उमेदवार घोषित करणे बाकी असल्याने मुक्ताईनगरची उमेदवारी कोणाला मिळते याची उत्सुकता ताणली गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here