ब्रेकिंग : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दर्ग्याजवळ भीषण अपघात

0

रत्नागिरी : हातखंबा भागातील दर्ग्या समोरील रस्ता मागील अनेक दिवसांपासून अपघातांसाठी हॉट स्पॉट ठरत आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी ब्रेक फेल झालेल्या मालवाहू ट्रकने या ठिकाणी चार वाहनांना ठोकरले आहे. त्यातील दोन वाहने दर्ग्या समोरच्या दरीत कोसळली आहेत. दोन वाहने रस्त्यालगत पडली आहेत. अपघातामध्ये सहाजण जखमी झाल्याचे समजते. त्यांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिका तसेच 108 रुग्णवाहिका यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
9:22 PM 26-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here