पेण: दरोडेखोरांकडून पोलिसांवर गोळीबार; दोघांना अटक

0

पेण : पेण येथून चोरीला गेलेली कार निर्दशनास येताच पोलिसांनी त्या कारचा पाठलाग केला. यात या कारचा अपघात झाला. यावेळी कारमधील दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. काल, गुरूवार (दि.२५) पहाटेच्या सुमारास आंबेगाव पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. यावेळी पोलिसांनी दोघा दरोडेखोरांना अटक केली. तर आणखी तिघांनी तेथून पळ काढला. दोन दिवसांपूर्वी पेणमधील कोस्तुभ भिडे यांच्या मालकीची इको कार चोरीला गेली. या कारचा शोध घेत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे तपास करताना पोलिसांना ही कार पेण नगरपरिषदेच्या नाक्यावरून जात असल्याची निर्दशनास आली. यावेळी पोलिसांनी या कारचा पाठलाग केला. मात्र पोलिसांपासून वाचण्यासाठी दरोडेखोरांनी ही कार जोरदार पळवली असता पुढे आंबेगाव पेट्रोल पंपाजवळ उभा असणाऱ्या ट्रेलरला कारची जोराची धडक झाली. यावेळी या दरोडेखोरांना अटक करण्यासाठी जात असताना त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याचबरोबर धारदार शस्त्रांचा धाक दाखवून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील पाच जणांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. असून उर्वरित तीन चोरट्यांचा अजूनही पेण पूर्व भागातील परिसरात शोध सुरू आहे. या चोरट्यांनी चोरून नेलेल्या गाडीत धारदार तसेच दरोड्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र सापडले असल्याने हे चोरटे मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, पेण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मोठा दरोडा टळला. पेणमध्ये गाडी पळवून नेणे आणि त्याच गाडीत बसून दरोडा टाकणे, पोलिसांवर गोळीबार करणे या घटना फिल्मी स्टाईल पेणमध्ये घडल्याने पेणवासिय व पोलिसही चक्रावून गेले.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here