अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार

0

राजापूर : अश्लील व्हिडीओ दाखवून काकाने आपल्या अकरा वर्षीय सख्ख्या अल्पवयीन पुतणीशी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली. यातील संशयित आरोपी असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीच्या काकाला राजापूर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत अटक केली आहे. यातील पीडित अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी हिचे आई, वडील हयात नसल्याने ती आपल्या आजी आजोबांसमवेत राहते. काही दिवसांपूर्वी ती आजी, आजोबांसमवेत मुंबईला गेली होती. त्यावेळी मुंबईतील तिच्या मावशीशी तिची भेट झाली. त्या पीडितेने गावात रहाणाऱ्या काकाने आपल्याला अश्लील व्हिडीओ दाखवले व अनैसर्गिक पध्दतीने अत्याचार केल्याचे मावशीला सांगितले व घडलेला प्रकार उघडकीस आला. अल्पवयीन पीडितेने दिलेल्या माहितीवरून तिच्या मावशीने मालवणी (मुंबई) पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. हा गुन्हा राजापूर पोलिस कार्यक्षेत्रात घडला असल्याने तपासासाठी तो राजापुर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक एस. एस. वेंगुर्लेकर अधिक तपास करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:08 PM 26-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here