स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे; ‘या’ भाजप नेत्याचा सल्ला

0

नवी दिल्ली : गुजरातमधील जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव दिल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले. यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यातच आता भाजपच्याच एका नेत्याने स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदींचे नाव गुजरात सरकारने मागे घ्यावे, असा सल्ला दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करून गुजरात सरकारला याबाबत सल्ला दिला आहे. ”गुजरातचा जावई या नात्याने राज्यातील अनेकांनी मला सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलल्याबाबत मला विचारणा केली. गुजरात सरकारने आपली चूक सुधारावी आणि स्टेडियमला दिलेले नरेंद्र मोदी यांचे नाव मागे घ्यावे. स्टेडियमला नाव देण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली नव्हती, हेदेखील गुजरात सरकारने सर्वांसमोर स्पष्ट करावे”, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:30 PM 26-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here