दीपक केसरकर यांचा सावंतवाडीत उमेदवारी अर्ज दाखल

0

सावंतवाडी : मी शिवरामराजेंचा इतिहास घेऊन पुन्हा एकदा निवडणुकीत उभे राहिलो आहे. ते पाच वेळा निवडून आले होते. परंतु आता ही माझी शेवटची टर्म आहे.काही झाले तरी मी हॅट्रीक साधेन, असा विश्‍वास व्यक्‍त करत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी  सौ. पल्लवी केसरकर, सावंतवाडी नगर परिषदेचे आरोग्य व क्रीडा सभापती खेमराज उर्फ बाबू कुडतरकर,  जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी आ.शंकर कांबळी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख  शैलेश परब, माजी जिल्हाप्रमुख  रमेश  गावकर, आदी उपस्थित होते. उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  सावंतवाडी विधानसभा मतदार  संघामध्ये  भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज  दाखल केल्याबाबत विचारले असता  राजन  तेलींबाबत भाजपाचे वरिष्ठ निर्णय घेतील, असे सांगितले.  या टर्म नंतर आपला राजकीय वारसदार कोणतरी दुसरा असेल. या ठिकाणी तिसर्‍यांदा कोणी निवडून येत नाही, असे भासविले जाते.  परंतु  शिवरामराजे तब्बल पाच वेळा निवडून आले होते. त्यामुळे मी विजयी होईन, असा विश्‍वास केसरकर यांनी व्यक्‍त केला. त्यानंतर त्यांनी बॅरिस्टर नाथ पै सभागृहामध्ये जाहीर सभेला संबोधित केले व शहरांमध्ये शिवसेनेची रॅली काढली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here