ओसवाल नगर सेक्स रॅकेट: संबंधित आंबट शौकिनांचे दणाणले धाबे, कॉन्टॅक्ट लिस्ट मधील ३३५ जण पोलिसांच्या रडारवर

0

🔳 ‘माल आलाय’ मोबाईलवर सांकेतिक भाषेचा होत होता वापर

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी : काल ओसवाल नगर येथील सेक्स रॅकेट चा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केल्यावर आता या प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, अटकेतील पद्मनीबाई तुकाराम बादलवाड व शिवाजी आनंदराव पाटील यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयितांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. मोबाईल फोन मध्ये सेव्ह असणारी ३३५ जणांची यादी आता पोलीस आपल्या पध्दतीने तपासणार आहेत. यामुळे या प्रकरणात गुंतलेल्या आंबट शकिनांना आता चांगलाच दणका मिळणार आहे. एकदा आलेल्या ग्राहकाचा नंबर संशयित आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे. पुणा, मुंबईतून मुली आल्यावर सांकेतिक भाषेचा वापर करून संबंधित ग्राहकांना मेसेज पाठवले जायचे अशी माहिती मिळत आहे. पुण्याहून, मुंबईहून माल आलाय असे मेसेज जाताच संबंधित येथे हजेरी लावायचे अशी माहिती मिळत आहे. काल ही घटना उघडकीस आल्यावर रात्री उशिरा या गुन्ह्याचा तपास शहर पोलिसांकडे सोपवण्यात आला. मात्र आज सकाळीच कुवारबाव येथे मोबाईल दुकानात झालेल्या चोरीमुळे पोलिसांची सारी यंत्रणा या चोरीचा छडा लावण्याच्या कामात गुंतल्याने सेक्स रॅकेट मधील संशयितांची चौकशी करण्यास पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला नाही. पण उद्यापासून या अनैतिक धंद्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलीस कामाला लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
8:24 PM 26-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here