नेवरे येथे फसकीत अडकला बिबट्या

0

◼️ ना. उदय सामंत यांनी भ्रमणध्वनी वरून दिली माहिती

रत्नागिरी : दि 26/02/2021 रोजी मौ. नेवरे येथे बिबट्या फसकीत अडकल्याची बातमी मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदयजी सामंत यांनी भ्रमणध्वनी वरून परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना 5.30 वाजताच्या दरम्यान दिली. तदनंतर परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी व स्टाफ मौ. नेवरे येथे जावून खात्री केली असता बिबट्या फसकीत अडकलेला दिसून आला. सदर बिबट्यास कटर च्या सहाय्याने फासकी तोडून बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली. बिबट्यास पिंजऱ्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी रत्नागिरी यांचे कडून तपासणी करून घेतली व तदनंतर सदर बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडले . सदर चे रेस्क्यू ऑपरेशन हे मा. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी श्री. दिपक पोपटराव खाडे, व सहाय्यक वनसंरक्षक श्री. सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्रीम. प्रियंका पंढरीनाथ लगड, वनपाल पाली श्री. गौ. पि. कांबळे, वनरक्षक जाकदेवी श्री. म.ग. पाटील, वनरक्षक रत्नागिरी श्रीम. मि. म. कुबल, वनरक्षक कोर्ले श्री. सा. रं. पताडे यांनी पार पाडली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:08 AM 27-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here