जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत 20 अर्ज दाखल

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत गुरुवारी 13 उमेदवारांनी 20 अर्ज दाखल केले. शिवसेनेच्या वतीने चार मतदारसंघांत शक्‍तिप्रदर्शन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेच्या चार उमेदवारांनी गुरुवारचा मुहूर्त साधला. यात राजापूरमधून राजन साळवी, चिपळूण-संगमेश्‍वरमधून सदानंद चव्हाण, गुहागरमधून भास्कर जाधव, खेड-दापोलीतून योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या चारही ठिकाणी शिवसेनेने शक्‍तिप्रदर्शन केले. आघाडीच्या वतीने खेड-दापोलीत राष्ट्रवादीचे संजय कदम यांनीही शक्‍तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. रत्नागिरीत राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर यांनीही प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. राजापूरमध्ये आघाडीमध्ये काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांनीही शक्‍तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज प्रांतांकडे सादर केला.  रत्नागिरीमध्ये बहुजन मुक्‍ती पक्षातर्फे प्रदीप कचरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून दापोली, गुहागर, चिपळूणमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी उमेदवारी अर्ज मात्र दाखल केलेले नाहीत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोणत्या मतदारसंघात आणखी किती उमेदवारी अर्ज दाखल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी मतदारसंघातून आमदार उदय सामंत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी मराठा मैदानावर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद गटातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

IMG-20220514-WA0009

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here