‘आता मीच तुम्हाला पुरून उरणार, पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार आणि बोलत राहणार’; चित्रा वाघ यांचे ठाकरे सरकारला आव्हान

0

नाशिक : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांच्या पतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पतीवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या नवऱ्याला गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रास दिला जातो. मलाही काही प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. आता नवी माणसं उभी करून माझ्यावरही काही गुन्हे दाखल होतील. मात्र मी याला घाबरत नाही. आता मीच तुम्हाला पुरून उरणार. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार, रोज बोलणार आणि न्याय मिळेपर्यंत बोलत राहणार, असे प्रतिआव्हानच चित्रा वाघ यांनी दिले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:26 PM 27-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here