परीक्षेसाठी ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही पर्याय : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

0

सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. आता उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या परीक्षांचा निर्णय प्रत्येक विद्यापीठाने घेतलेला आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. मात्र त्या ऐच्छिक ठेवलेल्या आहेत, विद्यार्थ्यांना जसं शक्य असेल तसे त्यांनी परीक्षा ऑफलाईन द्यायची की ऑनलाईन हे कळवावं लागणार आहे. तसा निर्णय सर्व कुलगुरूंनी घेतलेला आहे. तसेच इंजिनीअरिंग आणि पॉलिटेक्निक सेमिस्टरच्या परीक्षा शंभर टक्के ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलीय.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:08 PM 27-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here