मुंबई : घाटकोपर पूर्व येथून भाजपने उमेदवारी घोषीत केलेल्या पराग शाह यांची गाडी भाजप कार्यकर्त्यांनी अडवत त्यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. शाह हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे. माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे तिकीट पक्षाने कापल्याने घाटकोपरमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश मेहता आणि भाजपने एबी फाँर्म दिलेले अधिकृत उमेदवार पराग शहा यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. मेहता समर्थकांनी पराग शहा ज्या कारमध्ये बसले होते तीच कार फोडली. महेता समर्थकांनी पराग शहाच्या कारला घेराव देखील घातला. त्यानंतर घटनास्थळी प्रकाश मेहता दाखल झाले. या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली.
