वाचकांनी रत्नागिरी खबरदारला एक ब्रँड बनवलंय!

0

🔳 लवकरच रत्नागिरी खबरदार देणार एक आनंदाची बातमी

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

➡ बाजारातील बंद पाण्याच्या बाटलीला बिसलेरीने ओळख दिली…तसेच आज सोशल मिडियावरील बातमीला रत्नागिरी खबरदारने ओळख दिली आहे. व्हाट्सएपवर बातमी आली कि ती खबरदारला आली असा प्रघात रत्नागिरीत रूढ झालाय. वर्ष २०१३ साली सुरु झालेल्या रजिस्टर वृत्तपत्र रत्नागिरी खबरदारचे आज लाखो वाचक आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत क्षणार्धात बातमी पोहचवण्याची कल्पना सर्वप्रथम रत्नागिरी खबरदारने मांडली आणि वाचकांना ती प्रचंड आवडली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाखो वाचकांशी कनेक्ट; रत्नागिरी खबरदारच्या वेबसाईटला प्रत्येक महिन्याला मिळणारे सुमारे ७५ लाखांहून अधिक हिट्स, सुमारे २९ हजार वाचकांच्या मोबाईलमध्ये असणारे रत्नागिरी खबरदारचे न्यूज अॅप हे सर्व आम्हाला देखील थक्क करणारे आहे. खबरदारच्या व्हाट्सएप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी वाचक जीवाचे रान करतात…मोठ मोठ्या व्यक्तींकडून वशिला लावतात…दिवसातून अनेकांचे मेसेज येतात…अनेकजण तर आपण खबरदार ग्रुपमध्ये सहभागी असल्याचा अभिमान बाळगतात…अवघ्या तीन मिनिटात खबरदारचे पाच पाच ग्रुप हाउस फुल होतात…लिंक केव्हा येतेय याची वाट बघतात…हे खरंच वाचकांचे प्रेम आणि आमच्या विश्वसनीयतेची पावती आहे. खबरदारला बातमी यावी म्हणून प्रत्येकाची विलक्षण धडपड असते. एकंदर काय तर आमच्या वाचकांनीच रत्नागिरी खबरदारला एक ब्रँड बनवलंय. बातमीचा दर्जा आणि वाचकांची विश्वसनीयता कायम टिकवणे हि आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच प्रत्येक बातमीखाली ती प्रसिद्ध झाल्याची वेळ, दिनांक तसेच सोशल मिडीयावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक बातमीची रत्नागिरी खबरदार वेबसाईटवर असणारी नोंद, हे सर्व वाचकांच्या विश्वासार्हतेसाठीच आहे. याच मार्गावरून जाताना लवकरच आम्ही आमच्या वाचकांना एक आनंदाची बातमी देणार आहोत. तेव्हा वाचत रहा, पहात रहा आणि ऐकत रहा ! फक्त रत्नागिरी खबरदार.

हेमंत वणजु
संपादक रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
06:32 PM 27/Feb/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here