युनायटेड एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फेअर अ‍ॅसाशिएशनतर्फे विविध शाळांसाठी मास्क व सेनिटायर्झचे वाटप

0

रत्नागिरी : युनायटेड एज्युकेशनल अ‍ॅण्ड वेल्फेअर असोसिएशन रत्नागिरी तर्फे शहर व परिसरातील सात शांळासाठी मास्क व सॅनिटायझरच्या वाटपासाठी आयोजित कार्यक्रम शांततेत व उत्साहित वातावरणात पार पडला. उद्यमनगर येथील मेमन समाज हॉलमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष फिरोज गवाणकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेला या संभारंभाच्या वेळी वरिष्ठ पत्रकार आलिमिया काझी, शिरगाव ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच रहिमत काझी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे उर्दू विभाग प्रमुख डॉ. अब्दुल गणी दानिश, असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रफिक मुकादम व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोनाचा पुन्हा वाढत्या संक्रमणाचा विचार करून तसेच शासनाच्या नियमाचे तंतोतंत पालन करून कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. सर्वप्रथम शिरगांव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच रहिमत काझी यांचा असोसिएशनचे अध्यक्ष फिरोज गवाणकर यांच्या हस्ते त्यांना पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. व प्रमुख पाहुणे डॉ. अब्दुल गणी दानिश यांचा रफिक मुकादम यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाची गांभिर्याने दखल घेत शालेय विद्यार्थ्यांच्या सरंक्षणासाठी मास्क तसेच सॅनिटायझरर्स आवश्यक असल्याने युनायटेड अ‍ॅसासिएशनतर्फे रत्नागिरी शहर व परिसरातील काही शाळांसाठी मास्क व सॅनिटायझरर्सचे वाटप केले जात असल्याचे जनाब शौकत काझी यांनी आपला प्रस्ताविकात सांगितले. व शहरातील अजिजा दाउद नाईक हायस्कूल, मेस्त्री हायस्कूल उद्यमनगर येथील तसेच धनजी नाका येथील एम.एस.नाईक हायस्कूल इक्रा इंग्लिश स्कुल कोकणनगर जुलैखा दाउद काझी हायस्कूल पावस तसेच भाईशेट शेखहसन नाईकस्कूल साखरतर यांचे मुख्यध्यापक प्रतिनिधी कडे मास्क तथा सॅनिटायझरर्स कॅन सुपुर्द करण्यांत आले. जवळपास दोन हजार मास्क व 40 लिटर सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. या वेळी विविध शाळा तर्फे रहेमत काझी यांना पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्वच सभासदांचे प्रामुख्याने सलीम मुकादम व जमिर खलफे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन तथा आभारप्रदर्शन जनाब शौकत काझी यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:04 PM 28-Feb-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here