१० वर्षांत जम्मू-काश्मीर प्रगत होईल

0

नवी दिल्ली : दिल्ली ते जम्मूतील कटारा या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या सुरुवातीनंतर आता जम्मू-काश्मीरच्या विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आगामी दहा वर्षांत जम्मू-काश्मीर देशाच्या सर्वात विकसित राज्यांपैकी एक होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. दिल्ली ते वैष्णोदेवी यांना जोडणार्‍या वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनप्रसगी ते बोलत होते. या वेळी रेल्वे मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग, हर्षवर्धन उपस्थित होते. ही देशातील दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन आहे. यामध्ये सीसीटीव्ही, जीपीएस, वाय-फाय, बायो टॉयलेट अशा सुविधा आहेत. ही रेल्वे आठवड्यातून 6 दिवस धावेल. दिल्लीतून सकाळी 6 वाजता सुटेल तर कटारा येथे 2 वाजता वाजता पोहोचेल. तर कटारातून दुपारी 3 वाजता सुटून रात्री 11 वाजता दिल्लीत पोहोचेल. आधी या प्रवासाला 12 तास अवधी लागायचा. 

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here