गिम्हवणे येथील भैरी मंदिराची दानपेटी फोडून रोकड लंपास

0

जालगाव : दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील भैरी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून सुमारे दहा ते पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केली. दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता ग्रामस्थ मंदिरातील आरती आटपून, देऊळ बंद करून आपापल्या घरी गेल्यानंतर सायंकाळी साडेसात ते दि.२८ फेब्रुवारी सकाळी सात वाजण्याच्या कालावधीमध्ये अज्ञातांनी ही चोरी केली, असावी असा अंदाज बांधण्यात आला आहे. याबाबतची तक्रार शंकर काशिराम साळवी यांनी दापोली पोलिस स्थानकात दिली असून या घटनेचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:34 PM 01-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here