रत्नागिरीतील दुय्यम निबंधक कार्यालयाची दयनीय अवस्था

0

◼️ मालमत्ता नोंदणी करण्यासाठी येणाऱ्यांना साधी बसण्याचीही व्यवस्था नाही

रत्नागिरी : शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळवून देणाऱ्या रत्नागिरीतील मुख्यालय दुय्यम निबंधक कार्यालयाची अवस्था एखाद्या कोंडवाड्यारखी झाली आहे. त्याचबरोबर येथील कार्यपद्धती फारच अवघड आणि त्रासदायक आहे. मालमत्ता खरेदीतून स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी च्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या लखपती किंवा करोडपतींची अवस्था त्यांच्या राहणीमानाला साजेशी नाही. मालमत्ता नोंदणी करण्यासाठी येणाऱ्यांना साधी बसण्याचीही व्यवस्था नाही. त्यामुळे या कार्यालयातील अधिकाऱ्यांसह येथे नोंदणीच्या कामांसाठी येणाऱ्यांची फारच परवड होत आहे. खरेदी केलेल्या लाखो कोटी रुपये किमतीच्या मालमत्तांची शासकीय दरबारी नोंद करण्यासाठी मुख्यालय दुय्यम निबंधक कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आहे. हे कार्यालय पाहिले तर येथे ‘लाखोंचे धंदे आणि उभे राहायचे वांदे’ अशी स्थिती आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
2:16 PM 01-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here