खिणगिणी कुणबीवाडी येथे आंबा-काजू बागांना आग; सुमारे २० लाखांचे नुकसान

0

राजापूर : तालुक्यातील खिणगिणी कुणबीवाडी येथील आंबा, काजूच्या बागांना रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास आग लागली यामध्ये सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.खिणगिणी कुणबीवाडी येथील ११ हजार के. व्ही. विद्युत लाईन जात आहेत. या लाईनमध्येच शॉर्टसर्किटने झाले असल्याने लाईनच्या खाली असलेल्या बागांना आग लागली. ही घटना रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. येथील देऊ डोंगरकर, केशव राऊत यांची काजूची बाग व निशांत भोगटे यांची काजू आंबा बागेला आग लागली. यामध्ये निशांत भोगटे यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बागेमध्ये काम करीत असलेल्या मजुरांनी पथम आग पाहीली व ओरड सुरू केली. त्यामुळे नजीकच्या वाडीमधील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. जर ग्रामस्थांनी आग नियंत्रणात आणली नसती तर या परिसरातील अनेक बागा आगलागून मोठे नुकसान झाले असते. येथील माजी सरपंच विजय पाध्ये यांनी घटनास्थळी जात पथम लाईनमन राणे व तेरवणकर यांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यामुळे लाईनमनने त्वरित घटनास्थळी जाऊन विद्युत पुरवठा खंडित केला. बागांना लागलेली आग विझविण्यासाठी येथील अशोक डोंगरकर, बाबू तेरवणकर, बबन दिवाळे, सुनील डोंगरकर, जितू डोंगरकर, अनिल डोंगरकर, आबा दिवाळे, संभाजी डोंगरकर, संदीप डोंगरकर, हिराजी राऊत, कमलू राऊत यांनी मेहनत घेतली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:28 PM 02-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here