उमराठ ग्रामपंचायतीतर्फे ‘सरपंच आपल्या दारी’ उपक्रम

0

वरवेली : गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच जनार्दन आंबेकर, उपसरपंच सूरज घाडे व सदस्य उमराठ गावातील ग्रामस्थांच्या समस्या व विकासकामे आदींबाबत ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमामध्ये विकासकामे, शासकीय योजना, महिला बचत गटात सक्रिय सहभाग, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा परिचय होणे, गावातील समस्या व सोयी-सुविधांचा अभाव आदीबाबत ग्रामस्थांच्या सूचना स्वीकारणे, ग्रामस्थांशी चर्चा करणे व मार्गदर्शन करणे, आपला गाव आदर्श गाव ही संकल्पना पूर्ण करणे, आदी कामांबाबतच्या हेतूने ‘सरपंच आपल्या दारी’ हा उपक्रम उमराठ गावातील दहा वाड्यांमध्ये दहा दिवसांत राबविणार आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:52 PM 02-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here