राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, पण विधान भवनाच्या दारातूनच माघारी फिरले

0

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे सध्या मुंबईतील राजकीय वातावरण तापलेले आहे. कोरोनाचा पुन्हा वाढलेला संसर्ग, वीजबिल तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक आहेत. अशा परिस्थितीत मनसेप्रमुख राज ठाकरे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी विधान भवनात आले होते. मात्र ते मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच माघारी परतले. सध्या राज्यात कोरोनाचा फैलाव वाढलेला असल्याने कोरोनाबाबतचे नियम अधिक सक्त करण्यात आले आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच कडक निमयांची अंमलबजावणी करून होत आहे. त्यामुळे विधान भवनाच्या आवारात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह असणे अनिवार्य करण्यात आली आहे. कोरोना चाचणी केलेली नसल्यास विधान भवनात प्रवेश दिला जात नाही. दरम्यान, आज राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विधान भवनाजवळ गेले होते. मात्र त्यांनी कोरोनाची चाचणी केलेली नव्हती. विधान भवानात जाण्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य असल्याचे कळाल्यानंतर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच विधान भवनाच्या आवारातून माघारी फिरले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:27 PM 02-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here