जिल्ह्यातील मोठी कारवाई; गुहागरात तब्बल पावणेसहा लाखाची अनधिकृत गावठी दारू जप्त

0

गुहागर : कौंढर काळसूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ५ लाख ७६ हजार ९५० रुपयांची चोरटी गावठी दारू जप्त करण्यात आली. त्याशिवाय २३ हजाराचे दारूचे रसायनही ताब्यात घेण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी जिल्ह्यात गावठी हातभट्टी दारूच्या धंद्यावर धाडसत्र सुरू केल्याने हा धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कौंढर काळसूर येथे गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने हातभट्टीवर ही धाड टाकण्यात आली. जिल्ह्यातील ही मोठी कारवाई असून तेथे कोणीही व्यक्ती आढळून आली नाही. त्यामुळे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरटी दारू सापडल्याची तक्रार कर्मचारी निनाद सुर्वे यांनी नोंदविली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:24 AM 03-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here