संगमेश्वर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने बापाने मुलाच्या डोक्यावर कोयतीने वार केल्याने मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना संगमेश्वर येथील मेढे तर्फे फुणगुस गोताडवाडी येथे घडली. पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश धालु गोताड यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यांनी मुलगा दिवेश रमेश गोताड यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी दिवेशने पैसे देण्यास नकार दिला. पैसे न दिल्याने वडील रमेश यांना राग येऊन त्यांनी घरातील कोयत्याने मुलाच्या डोक्यावर वार केले. दिवेश यांच्या तक्रारीवरून वडील रमेश यांच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:22 PM 03-Mar-21