बदनामी करीत असल्याच्या संशयातून एकावर हल्ला

0

जालगाव : तालुक्यातील मुरूड येथे आपली गावांत बदनामी करत असल्याच्या गैरसमजातून लोखंडी सुऱ्याने एकाला जखमी केल्याची घटना घडली असून दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तालुक्यातील मुरुड येथील दुर्गेश दिगंबर मुरडकर हे त्यांच्याच गावातील अब्दुल रउफ बरोडकर यांच्याकडे सोलर हिटरच्या व्यवसायासाठी दोन महिन्यांपूर्वी कामाला होते. मात्र, काही दिवसांपूर्वीपासून त्यांना गैरसमज झाला की गावांत मुरडकर हे आपली बदनामी करत आहेत. या रागातून सोमवारी रात्री १०.१५ वा. च्या सुमारास या दोघांत बाचाबाची झाली व यावेळी बरोंडकर यांनी रागाच्या भरात लोखंडी सुरा उलटा पकडून खांद्यावर तसेच पायावर मारला. याबबात अधिक तपास हर्णे दूरक्षेत्राचे हे.काँ. कांबळे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:22 PM 03-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here