शिक्षकांचे डिसेंबरपर्यंतचे थकीत वेतन ऑफलाईन

0

पुणे : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे डिसेंबरपर्यंतचे नियमित आणि थकीत वेतन ऑफलाईन पद्धतीनेच दिले जाणार आहे. शालार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने शिक्षक आणि शिक्षकेतरकर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी शालार्थ प्रणाली विकसित आहे. मात्र, दीड-पावणेदोन वर्षांपूर्वी तांत्रिक अडचणींच्या फेऱ्यात सापडलेली शालार्थ प्रणाली बंदच असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीनेच देण्याची वेळ शासनावर आली आहे. ऑफलाईन वेतन देताना वेतन वेळेवर होत नसल्याचीही तक्रार अनेकदा करण्यात आलेली आहे. असे असतानाही ऑफलाईन पद्धतीने वेतन देण्यावाचून शासनाकडे पर्याय नसल्याचेही दिसून येत आहे.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here