गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ऑनलाईन ‘झेप’ युवा सांस्कृतिक महोत्सव

0

रत्नागिरी : तरुणाईचे मुख्य आकर्षण असलेला ‘झेप’ हा महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव या वर्षी कोव्हिड आपत्तीत होऊ शकत नाही. मात्र विद्यापीठस्तरीय कला स्पर्धांची तयारी व विद्यार्थी कलागुणांना संधी आणि प्रोत्साहन देण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शासकीय व विद्यापीठ नियमांचे पालन करीत ऑनलाईन युवा महोत्सवाचे अभूतपूर्व आयोजन केले होते. या महोत्सवात २५ पेक्षा जास्त कलाप्रकारांची ऑनलाईन माध्यमातून स्पर्धा घेऊन तसेच त्यांचे आभासी थेट प्रक्षेपण करून युट्यूब, इन्स्टाग्राम फेसबुक, गुगल, गोगटे कलांगण, जीजेसी कल्चरल अशा प्रसार माध्यम तून ऑनलाइन करून युवा सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:06 PM 04-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here