ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पोलिसांना निवेदन

0

चिपळूण : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा व अन्य प्रश्नासंबंधी तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात चिपळूण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नुकतेच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी व पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना निवेदन दिले. यानुसार, ज्येष्ठ नागरिकांना विनाशुल्क हेल्पलाईन सुरू करून आणीबाणीच्या वेळी आरोग्यविषयक सुविधा तसेच सुरक्षा देणे, पोलिस अधिकाऱ्यांनी ज्येष्ठांच्या प्रश्नांबाबत जागरुकता दाखविणे, तक्रारींची दखल प्राधान्याने घेणे, शहरात एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची अद्ययावत यादी पोलिस ठाण्यात उपलब्ध करावी आदी मागण्या केल्या. यावेळी उस्मान बांगी, बबन नारकर, विजय बापट, प्रताप गजमल, सुरेश जाधव आदी उपस्थित होते. पोलिस खात्याकडून ज्येष्ठांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:32 PM 04-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here