PMC बँक घोटाळ्याप्रकरणी जॉय थॉमसला अटक

0

मुंबई – PMC बँक घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) कारवाई करत पीएमसीचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक केली आहे. तसेच काल अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील मुंबईतील सहा ठिकाणच्या संपत्तीवर छापे टाकले होते. तसेच पीएमसीचे अध्यक्ष वॅरियम वरियम सिंग आणि माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्या या संपत्ती असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच कालच ईओडब्ल्यूने डीआयएलचे राकेश आणि सारंग वाधवानला अटक यांना अटक केली अशी माहिती ईवोडब्ल्यूचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांनी दिली. पीएमसी बँकप्रकरणी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरबीआयच्या प्रशासक यांच्या आदेशावरून जसबीर सिंग मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर्थिक गुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार या तिघांना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. मठ्ठा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पीएमसी या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि अध्यक्ष वरियम सिंग आणि बँकेचे इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएल कंपनीचा संचालक वाढवा यांनी २००८ ते २०९ या कालावधीत पीएमसी बँक, भांडुप (प.) या बँकेतील ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाती ज्यामध्ये कर्ज परतफेड होत नसल्याने अनुत्पादक कर्ज (एनपीए) झाली असतानाही त्यांना अनुत्पादक कर्ज घोषित केले नाही आणि त्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक आरबीआयपासून लपवून ठेवली आणि कमी कर्ज रक्कमेच्या बनावट कर्ज खात्यांचा बँकेचा खोटा व बनावट अभिलेख तयार करून आरबीआयला माहिती सादर केली. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रक्कमेचे नुकसान झाल्याचे आढळून आले आणि हा गैरप्रकार झाल्याचे उघड झाले. गैरव्यवहाराचे रक्कमेमध्ये आणि मोठ्या कर्जप्रकरणांपैकी प्रमुख कर्जदार आरोपी असलेली कंपनी हौसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीज असून त्यांनी बँकेच्या पदाधिकारी यांच्याशी संगनमत करून बेकायदेशीररित्या कर्ज प्राप्त करून घेतले आणि परतफेड देखील केली नाही.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here