भारत वि. इंग्लंड: इंग्लंडचा डाव पहिल्या दिवशीच गडगडला

0

नाणेफेकीचा कौल बाजूनं लागला… फलंदाजांना पोषक खेळपट्टी… असे असूनही इंग्लंडच्या फलंदाजांना चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशी खेळणे अवघडच गेले.भारताचे फिरकीपटू अक्षर पटेल, आर अश्विन आणि वॉशिंग्टन सूंदर यांनी इंग्लंडला दणके दिलेच. पण, जसप्रीत बुमराहच्या जागी स्थान मिळालेल्या मोहम्मद सिराजनं इंग्लंडचा कर्णधार जो रूटला माघारी पाठवून मोठं यश मिळवलं.बेन स्टोक्स याचे अर्धशतक आणि डॅन लॉरेन्स याच्या संघर्षमय खेळीनं इंग्लंडची लाज वाचवली. पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इशांत शर्मानं इंग्लंडचा सलामीवीरासाठी पायचीतची अपील केलं. मैदानावरील पंचांनी नाबाद दिल्यानंतर विराट कोहलीनं DRS घेतला, परंतु त्याचा फार काही उपयोग झाला नाही.सहाव्या षटाकात कोहलीनं अक्षर पटेलला बोलावलं अन् अक्षरनं पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. डॉम सिब्ली ( २) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पुढच्या षटकात अक्षरनं इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली ( ९) याला चूक करण्यास भाग पाडले आणि इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर १५ धावांवर माघारी परतले.त्यानंतर मोहम्मद सिराजनं इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. पण, ३ बाद ३० धावांवरून इंग्लंडचा डाव बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो यांनी सावरला. बेन स्टोक्सनं २४वे कसोटी अर्धशतक झळकावताना बेअरस्टोसह ४८ धावांची भागीदार केली.स्टोक्सनं ऑली पोपसह ४३ धावांची भागीदारी केली. पण, वॉशिंग्टन सुंदरनं त्याला बाद केले. स्टोक्स १२१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकार खेचून ५५ धावांवर माघारी परतला.डॅन लॉरेन्स आणि पोप यांचीही जोडी जमली आणि त्यांनी ४५ धावा जोडल्या. पण ही दोघं माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. लॉरेन्स ४६, तर पोप २९ धावांवर माघारी परतले. अक्षर पटेलनं चार, आर अश्विननं ३, मोहम्मद सिराजनं २ आणि वॉशिंग्टन सूंदरनं १ विकेट घेतली. इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर गडगडला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:05 PM 04-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here