संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

0

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वादात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. दरम्यान, तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, हा राजीनामा आज राज्यपालांनी मंजूर केला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:04 PM 04-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here