खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या पोलीस निरीक्षक सौ. सुवर्णा पत्की यांचे जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी २ मार्च या दिवशी सुवर्णा पत्की यांच्याविषयीच्या तक्रारी पुराव्यांसह विधान परिषदेत सादर केल्या होत्या. या तक्रारीवरून ३ मार्च या दिवशी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुवर्णा पत्की यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सभागृहात दिली. दरम्यान, रामदास कदम यांनी सभागृहात केलेल्या वक्तव्या बद्दल खेड मधील महिलांनी संताप व्यक्त केला असून पत्कींच्या समर्थनार्थ महिला एकवटल्या आहेत. ”खेड तालुक्यामाधल्या ज्या पत्की म्हणून पोलीस निरीक्षक आहेत त्या खेड पोलीस स्टेशन म्हणजे स्वतःची खाजगी मालमत्ता समजतात.याच्या आधी देखील त्यांना साताऱ्यामध्ये सस्पेंड केल होत, आणि इथे या सभागृहामध्ये बोलू शकणार नाही कि दुपार झाली संध्याकाळ झाली कि त्या कुठल्या अवस्थेत असतात”, असं व्यक्तव्य रामदास कदम यांनी सभागृहात केलं होतं. याविरोधात खेड मधील महिलांनी निषेध व्यक्त केला असून त्यांनी रामदासभाई यांनी जाहीर माफी मागावी अशी संतप्त मागणी केली आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:26 PM 04-Mar-21