पोओपी बंदीबाबत लवकरच राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करणार : एकनाथ शिंदे

0

मुंबई : शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांच्या भावना गणेशोत्सवाशी जोडल्या आहेत, त्यामुळे कुंभार समाजावर अन्याय होऊ देणार नाही. पीओपीवरील बंदी हटविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत लवकरच राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करू, अशी ग्वाही शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळास दिली. कुंभार समाजाचा व्यवसाय माती आणि पीओपीवर अवलंबून आहे. मात्र, पीओपीवर बंदी घालण्यात आल्याने कुंभार समाजाचे नुकसान होत आहे. त्यात गेल्या दोन वर्षांत महापूर आणि कोरोनामुळे कुंभार बांधवांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. त्यामुळे शासनाने पीओपीवरील बंदी उठवावी, या मागणीचे निवेदन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली येथील कुंभार समाजाच्या शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. यावेळी कोल्हापूरचे माजी महापौर मारुतीराव कातवरे, संभाजी माजगावकर, अनिल निगवेकर, सतीश बाचणीकर, रवी माजगांवकर, सुनील माजगावकर, शिवाजी वडणगेकर, पुणे कुंभार समाजाचे प्रवीण बावदणकर, पेण कुंभार समाजाचे अभय म्हात्रे, कैलास पाटील, हेमंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:42 AM 05-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here