उदय सामंत हे महराष्ट्राचे वैभव : खा. विनायक राऊत

0

रत्नागिरी :  शिवसेनेच्या झालेल्या विराट मेळाव्याला खासदार विनायक राऊत यांनी आपल्या तडाखेबाज छोटेखानी भाषणाने अक्षरशः जिंकल. ‘उदय सामंत हे महराष्ट्राचे वैभव आहे’ या राऊतांच्या वाक्याने तर अख्या जनसागराच्या अंगावर रोमांच उभे राहिले. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा गडगडाट केला. महायुतीशी टक्कर देण्याचा प्रयत्न करू नका, विरोधकांनी अर्ज भरा मात्र ७ तारखेला माघार घ्या असा सल्ला देखील खासदार विनायक राऊत यांनी आपल्या खुमासदार शैलीत विरोधकांना दिला. ४ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित जासागाराला संबोधित करताना खा.विनायक राऊत बोलत होते. आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत हे संपूर्ण महराष्ट्रात प्रचंड मतांनी निवडून येणारे पहिले तीन उमेदवार असतील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. भविष्यात तुमच्यासारखा कर्तबगार कोकणसम्राट या महराष्ट्रात नाव करेल अशी आशा देखील विनायक राऊत यांनी व्यक्त केली. खा. विनायक राऊत हे शिवसेनेचे सचिव आहेत. बळासाहेबांच्या कार्यशैलीत घडलेला एक कडवा शिवसैनिक म्हणून उभ्या महराष्ट्रात त्यांची ओळख आहे. म्हणूनच त्यांच्या तोंडून आमदार उदय सामंत यांच्याविषयी निघालेल्या गौरोद्गारांना फार महत्व असल्याचे बोलले जात आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here