राज्यात कुष्ठरुग्णांसाठी स्वतंत्र वसाहत योजनेबाबत शासन सकारात्मक : अमित देशमुख

0

मुंबई : राज्यातील कुष्ठरुग्णांसाठी स्वतंत्र वसाहत बांधण्याच्या योजनेबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्य ॲड.आशिष शेलार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सदस्य श्रीमती प्रणीती शिंदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना श्री.देशमुख बोलत होते.

एका उपप्रश्नाला उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी सांगितले की, कुष्ठरोग शोध अभियानामध्ये डिसेंबर 2020 अखेर राज्यात 5281 नवीन रुग्ण आढळले असून त्यापैकी 450 (8.52 टक्के) लहान मुले आढळली आहेत. या अभियानात आढळलेल्या सर्व कुष्ठरुग्णांना त्वरित बहुविध औषधोपचार मोफत सुरु करण्यात आला असून त्यांच्या सहवासितांना प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात आला आहे. राज्यात 8 फेब्रुवारीपासून सक्रिय कुष्ठरोग शोध अभियान नियमित सनियंत्रण कार्यक्रम सुरु करण्यात आल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी भाग घेतला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:14 PM 05-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here