यंत्रमागधारकांसाठीच्या वीजदर सवलतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

0

मुंबई : महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंर्तगत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांसाठी आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली असून आता अंतिम मुदत दि. 31 मे 2021, ही आहे. तसेच 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना ऑफलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आहे. त्यामुळे वीजदर सवलत मिळण्यासाठी यंत्रमागधारकांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्तालयाने केले आहे. वस्त्रोद्योग आयुक्तालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, राज्य शासनाच्या राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https://www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31 मे 2021 पर्यंत आहे. तसेच 25 फेब्रुवारी 2021च्या शासन निर्णयानुसार, 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग धारकांना नोंदणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन यापैकी कुठल्याही प्रकारे अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन अर्ज करणाऱ्या यंत्रमागधारकांनी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरील अर्ज डाऊनलोड करून वस्त्रोद्योग आयुक्त, महाराष्ट्र राज्य, सिव्हिल लाईन्स, नागपूर या ठिकाणी पाठवावेत, असे वस्त्रोद्योग आयुक्त शीतल तेली – उगले यांनी कळविले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:25 PM 05-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here