अजित पवारांविरोधात मुनगंटीवारांची हक्कभंगाची सूचना, उपाध्यक्षांकडून स्वीकृत

0

मुंबई : वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यासंदर्भात वित्तमंत्री अजित पवार यांनी मागील अधिवेशनात दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून भाजप नेते तथा माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवार यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना मांडली. दरम्यान उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ती स्वीकारली आहे. मुनगंटीवार म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्‍ट्राचा सर्वंकष विकास साधायचा असेल तर वैधानिक विकास मंडळाची कवचकुंडले असणे अत्‍यंत गरजेचे आहे. मात्र राज्‍य सरकार यादृष्‍टीने गंभीर नाही, ही अतिशय चिंतेची बाब आहे. या विभागावर निधी वितरणासंदर्भात अन्‍याय होण्‍याची शक्‍यता आहे. उपमुख्‍यमंत्र्यांनी वैधानिक विकास मंडळे स्‍थापन करण्‍याबाबत दिलेले आश्‍वासन न पाळणे व ही मंडळे स्‍थापन न करणे हा या सार्वभौम सभागृहांच्‍या विशेषाधिकाराचा भंग आहे. त्यामुळे हे प्रकरण विधानसभेच्‍या विशेष हक्‍क समितीकडे पाठवावे, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. त्यावर उपाध्यक्ष झिरवळ यांनी ती स्वीकृत केली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:44 PM 06-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here