शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी पोलिसांच्या ताब्यात

0

मुंबई : मुंबई हायकोर्टने मुंबईच्या आरे जंगल घोषित करण्याच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यानंतर, शुक्रवारी उशिरा रात्री झाडे तोडण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु, काही वेळानंतर तेथे आंदोलन सुरू झाले आणि मेट्रो रेल्वे साईटवर घोषणाबाजी झाली. वृक्ष तोडीला जोरदार विरोध दर्शवला जात आहे. तरी, पोलिसांनी आंदोलक  करणाऱ्या पर्यावरणप्रेमींची धरपकड सुरु केली आहे. काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं आहे. इतकेच नव्हे तर शिवसेना प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनाही  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चतुर्वेदी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मी आरे येथे जात असताना पोलिसांनी मला रोखले. मी कोणताही कायदा मोडत नव्हते तरीही पोलिसांकडून मला जबरदस्तीने बेदखल केले गेले. मला कोठे नेले जात आहे याची माहितीदेखील पोलिस देत नसल्याचे चतुर्वेदी यांनी ट्विट करून सांगितले आहे.  एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच गोरेगाव मेट्रो कारशेड प्रकल्पातील झाडे कापल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. वृक्ष तोडीचा विरोध करण्यासाठी अनेक दिग्गजांनी सरकारच्या विरोधात उडी घेतली आहे. सेलेब्सनीही ट्विट करून झाडे तोडण्यास विरोध दर्शवला आहे. दरम्यान आरेतील जंगलतोडीनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. या वृक्षतोडीला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी विरोध केला आहे. विकासासाठी जैवविविधतेला संपवणं लज्जास्पद असल्याचं म्हणत त्यांनी वृक्षतोडी विरोधात आंदोलकांना पाठिंबा दर्शवला आहे.

IMG-20220514-WA0009


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here