मुंबई : इंडोनिशिया येथे नुकत्याच झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये भारताचा चित्रेश नटेशन हा ‘आशिया श्री’ किताब विजेता ठरला. भारताला या स्पर्धेमध्ये आठ सुवर्ण, सहा रौप्य व आठ कांस्यपदके मिळाली. भारत या स्पर्धेचा उपविजेता ठरला. 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2019 दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये 25 देशांच्या 250 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कुंदन गोपे 55 किलो (भारतीय रेल्वे), हरी बाबू 70 किलो (भारतीय रेल्वे), वि. जयप्रकाश 75 किलो (भारतीय रेल्वे), सरबो सिंग 80 किलो (भारतीय रेल्वे), चित्रेश नटेशन 90 किलो (केरळ), रोहित शेट्टी 100 किलो (महाराष्ट्र) यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. तर, दिव्यांग स्पर्धेमध्ये श्याम सिंग शेरा (पंजाब) याने सुवर्ण पदक पटकावले.
