ब्रेकिंग : रत्नागिरी खबरदारला मिळाले आय. एस. ओ. मानांकन

0

रत्नागिरी : लाखो वाचकांपर्यंत दर्जेदार आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवणाऱ्या रत्नागिरी खबरदारला आय. एस. ओ. ९००१:२०१५ हे मानांकन मिळाले आहे. लाखो वाचकांपर्यंत बातम्या पोहचवण्यासाठी वापरण्यात आलेली आधुनिक पद्धत, गुणवत्ता याची दखल घेत हे मानांकन देण्यात आले आहे. वाचकांपर्यंत बातम्या पोहोचवताना जनजागृती देखील करण्याचे काम रत्नागिरी खबरदार आजवर करत आलाय. हे अंतराष्ट्रीय मानांकन, वृत्तपत्र चालवताना वापरण्यात आलेली दर्जात्मक प्रणाली; आय. एस. ओ. मानांकन संस्थेने घालून दिलेल्या प्रमाणकानुसार असल्याने देण्यात आले आहे. आज कोकणातील सर्वात मोठे सुपरफास्ट नेटवर्क म्हणून रत्नागिरी खबरदारची ओळख आहे. २०१३ साली सुरु झालेले हे वृत्तपत्र आज रत्नागिरीशी नाळ जोडलेल्या जगभरातील वाचकांपर्यंत पोहचले आहे. वाचकांचे मिळालेले अभूतपूर्व प्रेम, सल्ले, सूचना याच जोरावर आज आम्ही या टप्प्यावर येऊन पोहचलो आहोत असे रत्नागिरी खबरदारचे संपादक हेमंत वणजु यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
05:07 PM 07/Mar/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here