देशात मॉब लिंचिंगविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार्‍या सेलिब्रिटींवर गुन्हा

0

पाटणा : देशात मॉब लिंचिंगविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहून आवाज उठवणार्‍या 50 सेलिब्रिटींविरोधात बिहारच्या मुझ्झफरपूर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंड विधानातील देशद्रोह, सार्वजनिक उपद्रव, धार्मिक भावना दुखवणे आणि शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, या कलमांतर्गत या सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक वकील सुधीरकुमार ओझा यांनी बिहार न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. मुझ्झफरपूरचे मुख्य न्याय दंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांनी दोन महिन्यांपूर्वी ही याचिका दाखल करून घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा दाखल झाला आहे. फूट पाडणार्‍या या  सेलिब्रिटींनी देशाची प्रतिमा मलिन केली असून पंतप्रधानांच्या कार्याला कमी लेखले आहे, असे याचिकाकर्ते ओझा यांनी म्हटले आहे. या 50 जणांमध्ये चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल, मणिरत्नम आणि अनुराग कश्यप, अभिनेत्री अपर्णा सेन, कोंकणा सेन-शर्मा, लेखक रामचंद्र गुहा, अभिनेता सौमित्र चॅटर्जी, पार्श्वगायिका शुभा मुद्गल आदींचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here