राजकीय घडामोडींना वेग: शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन, नाणारबद्दल म्हणाले…

0

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील नाणार प्रकल्पावर रोखठोक भूमिका मांडल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेनेनं सावध भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना फोन करून भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात तापलेल्या नाणार प्रकल्पाच्या मुद्यावर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. आज खुद्द शरद पवार यांनी आपल्याला फोन केला होता, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. ‘मला शरद पवार यांचा फोन आला होता. त्यांनी माझी नाणार प्रकल्पाबद्दल भूमिका योग्य असल्याचे म्हटलंय. आता पवार साहेब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे’, असं राज ठाकरे यांनी सांगितले. तसंच, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना वेळ नक्की देतील. मुख्यमंत्री तुम्हाला मला वेळ, देत नसतील तरी ते पवारांना नक्की वेळ देतील’ असा टोलाही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:15 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here