कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान मिथून चक्रवर्ती यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. पक्षप्रवेश करताच मिथून चक्रवर्ती यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. मी खरा कोब्रा असून माझा डंख पाणीही मागू देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:44 PM 08-Mar-21
