सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महिला सीएंचा सत्कार

0

रत्नागिरी : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून रत्नागिरीतील महिला सीएंचा सत्कार सी. ए. इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे मथुरा एक्झिक्युटिव्ह येथे करण्यात आला. या वेळी अॅड. संध्या सुखटणकर, रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सी. ए. आनंद पंडित, सचिव सी. ए. प्रसाद आचरेकर यांनी महिला सीएंना सन्मानित केले. या वेळी अभिलाषा मुळ्ये, अनुष्का हळबे, शमिका सरपोतदार, अमृता बेर्डे, मीनल काळे, मोनाली कुलकर्णी, स्नेहा भिंगारदिवे, तेजल वारे, जान्हवी पटवर्धन, नयन सुर्वे, धनश्री करमरकर आणि अपूर्वा चांदककर सर्व महिला सीएंना सन्मानित केले. सी. ए. मोनाली कुलकर्णी आणि सी. ए. मीनल काळे यांनी शाखेचे विशेष आभार मानले.

महिला दिनाचे औचित्य साधून अॅड. संध्या सुखटणकर यांचे ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम २०१३’ यावर विशेष व्याख्यान झाले. रत्नागिरी व परिसरातील हृदयद्रावक घटना, घडामोडी सांगून त्यांनी महिलांवरील अत्याचार व त्याला रोखण्यासाठी उचललेली पावले, समाजाने कसा पुढाकार घ्यावा, याबाबत विस्तृत विवेचन केले. त्या कामाच्या ठिकाणी महिलांवर अन्याय झाल्यास तो सहन करू नका. यासाठी कायदा असून महिलांनी आपल्या भावना, सामाजिक भावना सक्षम होण्याची साठी काम करण्याची गरज आहे. याकरिता आर्थिकदृष्ट्या महिलांनी सक्षम झाले पाहिजे. जेथे दहा किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत, अशा प्रत्येक कामाच्या ठिकाणी मालकाने वा प्रशासकीय प्रमुखाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. महिलांनी योग्य ती काळजी घ्यावी. दुर्दैवाने अनपेक्षित घटना घडली तर त्या घटनेकडे अपघात म्हणून पाहिले पाहिजे. त्यात महिला मागे राहतात, पुढे जात नाहीत. अशा घटनांनी मनावर झालेला आघात दूर झाला पाहिजे. त्यासाठी अशा घटनेची पोलिसांकडे तत्काळ तक्रार करावी. काही प्रकरणात आरोपी सुटतात, अशी समाजाची भावना झाल्यामुळे तक्रार द्यायला मागे राहतात. योग्य वेळी तक्रार दिल्यास वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरतो. सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए आनंद पंडित यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. भारतीय संस्कृतीमधील स्त्रियांचे योगदान व महत्त्व नमूद करून आताच्या काळामधेही स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, याबद्दल समाधान व्यक्त केले. भारतामध्ये सीए इन्स्टिट्यूटची अशी एक शाखा आहे, ज्याची संपूर्ण कार्यकारी समिती महिलांची आहे, असे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:11 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here