जीडीपीबाबत बांगलादेश भारताला मागे टाकण्याची शक्यता

0

नवी दिल्ली : मागील काही काळापासून देशाचा जीडीपी दर घसरणीला लागला असल्याच्या पार्श्वभूमीवर याबाबतीत बांगलादेश भारताला मागे टाकण्याची शक्यता असल्याचा अंदाज आशियाई विकास बँक अर्थात एडीबीने वर्तवला आहे. एडीबीने वर्ष 2019 साठीचा आपला अहवाल जारी केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये भारताचा जीडीपी दर 6.5 टक्के इतका राहण्याचा तर बांगलादेशचा जीडीपी दर 8.1 टक्के इतका राहण्याचा अंदाज असून आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारत आणि बांगलादेश यांचा जीडीपी दर क्रमशः 7.2 टक्के आणि 8 टक्के इतका राहण्याचा अंदाज आहे. जगातील वेगाने विकसित होत असलेल्या मोजक्या देशांत भारताचा समावेश होतो हे खरे असले तरी आशियामध्ये बांगलादेशचा जीडीपी दर झपाट्याने वाढत चालला असल्याचे एडीबीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. वर्ष 2016 पासून भारताच्या जीडीपी दराची घसरण सुरू आहे. 2016 साली भारताचा जीडीपी दर 8.2 टक्के इतका होता तर वर्ष 2018 मध्ये तो 7 टक्क्यांपर्यंत खाली घसरला. दुसरीकडे बांगलादेशचा 2016 साली 7.1 टक्के इतका असलेला जीडीपी दर 2018 मध्ये 7.9 टक्के इतका नोंदवला गेला होता.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here