‘…तर शिवसेनेचे नेतेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील’ : फडणवीस

0

मुंबई : शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर ते देखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणवीस आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे पूर्णपणे समर्थन केले. मला राज ठाकरे यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व शंका संपल्या आहेत. ते या प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मदत करणार आहेत. ही ग्रीन रिफायनरी आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:40 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here