”…म्हणून महाराष्ट्रात कधीही भाजपची सत्ता येऊ शकते”

0

सातारा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार असल्याचे भाकित केले आहे.मुख्यमंत्र्यांनाही मोकळेपणाने काम करता येत नाही. त्यातच सन्मान मिळत नसल्याने काँग्रेसने पाठिंबा काढला तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच पुन्हा सत्तेवर येईल, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं नव्हतं. कधीही एकत्र न येणारे सत्तेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार वादविवादात सुरू आहे, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं. तसेच सध्या आमच्याकडे ११७ आमदार आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते. ते साताऱ्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:40 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here