चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार

0

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या धावपट्टीचा पृष्ठभागाचे काम समाधानकारक झाले नसल्याने प्रवासी वाहतुकीसाठी धावपट्टी परिपूर्ण नसल्याचे केंद्राच्या DGCA पथकाने अहवाल दिला आहे. चिपी विमानतळाची नुकतीच केंद्राच्या DGCA पथकाने पहाणी केली होती. DGCA च्या नियमाचे तंतोतंत पालन झालं नाही तर चिपी विमानतळ महाराष्ट्र एव्हिएशनच्या ताब्यात घेण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरू असून दिल्लीत 9 मार्चला एव्हिएशनच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. चिपी विमानतळाच्या धावपट्टीचा पृष्ठभाग अजूनही काही प्रमाणात खराब झाला असल्यामुळे अजून काही कालावधी विमानतळ सुरू होण्यासाठी लागेल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:02 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here