ब्रेकिंग : अजित पवारांकडून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, पहा महत्त्वाचे अपडेट्स

0

मुंबई : महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. सुरूवातीला अजित पवार यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर अर्थसंकल्पाचं वाचन सुरू केलं.

◼️ आरोग्य सेवांसाठी 7500 कोटींची तरतूद.

◼️ सरकारी रुग्णालयांत आग रोधक उपकरणे लावण्यात येतील.

◼️ सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारणार : अजित पवार

◼️ कोरोना काळात औद्योगिक काळात घट झाली, परंतू बळीराजाने तारले. शेतमालाचा व्यवहार पारदर्शी करण्यासाठी शासन प्रयत्नात. : अजित पवार

◼️ शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांनी हे कर्ज वेळेत भरले त्यांना शून्य़ टक्के व्याजदराने कर्ज मिळणार. व्याज राज्य सरकार भरणार. : अजित पवार.

◼️ 31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.: अजित पवार.

◼️ विकेल ते पिकेल धोरणानुसार 2100 कोटी रुपये तर एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी 2000 कोटी रुपये : अजित पवार

◼️ पशुसंवर्धन, मत्स्यपालनासाठी 3700 कोटी : अजित पवार

◼️ गोसीखुर्द प्रकल्पासाठी 1000 कोटींची तरतूद. 2023 पर्यंत पूर्ण करणार. : अजित पवार

◼️ निसर्ग चक्रीवादळ आणि राज्यातील आपत्ती पाहून महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तुकडी कायमस्वरुपी ठेवण्यासाठी केंद्राकडे मागणी. : अजित पवार

◼️ मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय असलेले रेवस-रेडी मार्गासाठी ९५७३ कोटींचा खर्च अपेक्षित. : अजित पवार.

◼️ पुण्याच्या 8 पदरी रिंगरोडसाठी 24 हजार कोटी लागणार, यावर्षीपासून भूसंपादनाचे काम हाती घेतले जाईल. : अजित पवार.

◼️ पूर्व द्रूतगती मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव : अजित पवार.

◼️ एसटीच्या डिझेल बसेस सीएनजी आणि इलेक्ट्रीक बसमध्ये रुपांतर करणार. : अजित पवार.

◼️ जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना १२ हजार ९१९ कोटींचा निधी

◼️ पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार. : अजित पवार.

◼️ देशभरात भ्रामक विज्ञानाचे स्तोम माजले आहे. प्रत्येक महसूल विभागात राजीव गांधी विज्ञान केंद्र उभारणार. : अजित पवार.

◼️ पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16139 कोटी मंजूर

◼️ समृद्धी महामार्गाचे काम 44% पूर्ण झाले, 500 किमीचा रस्ता 1 मे ला खुला करणार

◼️ ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार

◼️ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटींची तरतूद : अजित पवार.

◼️ विद्यार्थीनी, गृहिणी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर करणार. : अजित पवार.

◼️ राजमाता जिजाऊ गृहलक्ष्मी योजना जाहीर. घर घेताना ते महिलेच्या नावावर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार. : अजित पवार.

◼️ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना जाहीर. विद्यार्थीनींना मोफत बस प्रवास. परिवाहन विभागला सीएनजी, इलेक्ट्रीक बस देणार. : अजित पवार.

◼️ धूतपापेश्वर मंदीर, एकवीरा मंदीर, खंडोबा मंदीर, आनंदेश्वर, शिव मंदीरांचा विकास करणार. : अजित पवार.

◼️ सिंधुदूर्ग, रत्नागिरीमध्ये पर्यटन, मस्त्य व्यवसाय, सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी सिंधुरत्न योजना. तीन वर्षांत 300 कोटी निधी देणार : अजित पवार.

◼️ महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबई : महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. यावेळी महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
2:10 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here