रत्नागिरीत पानटपऱ्यांवर कारवाई; ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त

0

रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासन विभागाने गोडबोले स्टॉप आणि साळवी स्टॉप याठिकाणी गुरुवारी धाड टाकली. या धाडीत पान टपऱ्यांमधील प्रतिबंधित केलेला सुमारे ३४ हजार ४५७ रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. याप्रकरणी अब्दुल्ला खान, प्रमोद कळंबटे, सुनील लिंगायत आणि इतर ४ जण (सर्व रा. रत्नागिरी) अशा ७ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त प्रशांत गुंजाळ आणि दशरथ कांबळे यांनी केली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:55 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here