वकिलाला घातला ऑनलाईन गंडा; ७७ हजाराची फसवणूक

0

चिपळूण : चिपळुणातील वकील शाम चंद्रकांत नार्वेकर (४०) हे दि. ४ मार्च रोजी चिपळूण न्यायालयात असताना दुपारी १२ ते १२.३८ दरम्यान त्यांना एक अज्ञात महिलेचा फोन आला. मी एसबीआय क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत आहे. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी रिक्वेस्ट केली आहे. त्यासाठी तुम्हाला मेसेज पाठवला आहे. तो वाचून दाखवा, असे त्या महिलेने सांगितले. नार्वेकर यांनी तो वाचून दाखवला. तेव्हा तुमचे पैसे नवीन क्रेडिट कार्डमध्ये ट्रान्स्फर करण्यासाठी एक ओटीपी पाठवला आहे. तो सांगा असे सांगितले. नार्वेकर यांनी तो ओटीपी नंबर सांगितला आणि काही वेळेतच त्यांच्या क्रेडीट कार्डमधून तब्बल ७७ हजार ७७७ इतकी रक्कम काढल्याचा मेसेज त्यांना आला. त्यानंतर आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच नार्वेकर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:21 PM 08-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here